विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ(opportunity)इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपची संधी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेत काम करायला मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिप करताना तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या संस्थेत काम करण्याची ही उत्तम संधी आहे.

रिझर्व्ह बँकेने समर इंटर्नशिपसाठी अर्जप्रक्रिया सुरु केली आहे. (opportunity)१५ ऑक्टोबरपासून अर्ज मागवण्यात आले होते. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी तुम्हाला opportunities.rbi.org.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. एकूण १२५ जागांसाठी ही इंटर्नशिप जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
रिझर्व्ह बँकेची ही इंटर्नशिप ३ महिन्याची असणार आहे. (opportunity)एप्रिल ते जुलै या कालावधीत इंटर्नशिप असणार आहे. या इंटर्नशिपसाठी तुम्हाला २०,००० रुपये स्टायपेंडदेखील मिळणार आहे.रिझर्व्ह बँकेतील इंटर्नशिपसाठी पोस्ट ग्रॅज्युएट/पाच वर्षांचा मॅनेजमेंट/ स्टॅटिक्स / लॉ / कॉमर्स / इकोनॉमिक्स / इकोनॉमिट्रिक्स / बँकिंग / फायनान्स किंवा तीन वर्षांची बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. ही इंटर्नशिप २०२६ च्या एप्रिलमध्ये होणार आहे.

अर्ज कसा करावा?
या इंटर्नशिपसाठी opportunities.rbi.org.in वेबसाइटवर (opportunity)जावे लागेल.
यानंतर Current Vacancies वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला Summer Placement वर इंटर्नशिप दिसणार आहे.
यानंतर तुम्हाला इंटर्नशिपच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.
हेही वाचा :
शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान
१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट