आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं…(death) कुटुंबाची जबाबदारी, ऑफिसचा ताण, वैवाहिक आयुष्य आणि नातेवाईक यामुळे व्यक्ती कायम तणावात जगत असतो. अशात असे काही आजार मागे लागतात, ज्याबद्दल लवकर काही कळून येत नाही. अशाच आजारांपैकी एक म्हणजे डायबिटीज… फक्त भारतातच नाही तर, जगातील अनेक देशांमध्ये डायबिटीजची समस्या धोकादायक ठरत आहे… भारतात गेल्या 25 वर्षांत मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये जवळजवळ 3 पट वाढ झाली आहे. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जगभरात सध्या अंदाजे 60 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असताना, 2024 मध्ये दर नऊ सेकंदाला एका व्यक्तीचा डायबिटीजमुळे मृत्यू होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन ने प्रसिद्ध केलेल्या (death)डायबिटीज अॅटलस एडिशनमध्ये पुढील 25 वर्षांत डायबिटीजची समस्या गंभीर होईल असा अंदाज आहे. समोर आलेल्या, आकडेवारीनुसार, 2024 मध्ये, जगभरात 589 दशलक्ष लोक म्हणजेच 20 – 79 वयोगटातील 58 कोटींहून अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत आणि 2020 पर्यंत ही संख्या 85 कोटी पेक्षा जास्त होऊ शकते…रिपोर्टनुसार, सध्या, जगभरात 20 ते 79 वयोगटातील नऊ जणांपैकी एकाला डायबिटीजची लागण झाली आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे आणि 2025 पर्यंत ती 853 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढत्या आजाराचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे, या आजारावर जवळपास 1 ट्रिलियन डॉलर्स खर्च झाले आहेत, जे गेल्या 17 वर्षांत 388 टक्के वाढ आहे. दर नऊ सेकंदाला एका व्यक्तीचा मधुमेहामुळे मृत्यू होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

भारताबद्दल सांगायचं झालं तर, जागतिक स्तरावर, (death)डायबिटीजच्या प्रत्येक सात रुग्णांपैकी एक रुग्ण भारतातील आहे. भारतात, 2024 मध्ये 20 – 79 वयोगटातील अंदाजे 89.8 कोटी लोकांना डायबिटीजची लागण झाली होती… चीननंतर भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे.अंदाजानुसार, जर भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या याच वेगाने वाढत राहिली, तर 25 वर्षांनी, 2025 पर्यंत, आजच्या तुलनेत देशात 75 टक्के वाढ होईल. ही संख्या 2024 मध्ये 89.80 कोटी वरून 2050 मध्ये 156.7 दशलक्ष होईल. तर भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर राहील.2000 मध्ये देशात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या 3.20 कोटींपेक्षा अधिक होती… 2011 मध्ये वाढून 61.3 कोटींपर्यंत पोहोचली. 2024 मध्ये हा आकडा 8.98 कोटींपर्यंत पोहोचला. तर वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2000 च्या तुलनेत, 2050 मध्ये ही संख्या जवळजवळ 5 पटीने वाढेल.डायबिटीज हे देखील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. 2011 मध्ये भारतात या आजाराने 9 लाख 83 हजार 203 लोकांचा मृत्यू झाला, तर 2024 मध्ये ही संख्या कमी झाली. 2024 मध्ये डायबिटीजमुळे 334,922.2 लोकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

इचलकरंजीतील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीला महिला शिक्षिकेने किरकोळ कारणावरून केली बेदम मारहाण

राजकीय भूकंप! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार?

४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळEdit