सोशल मीडियावर सध्या ‘हेल्थ ट्रेंड्स’ची क्रेझ वाढत असून,(Detox) अनेकजण डिटॉक्स ड्रिंक, क्रॅश डाएट,फॅट बर्निंग स्मूदी सारख्या उपायांचा अवलंब करु लागले आहेत. आपण फिट आणि तरुण दिसावे या नीदात केले जाणारे ह प्रयोग शरीराचे नुकसान करतात. अशा फॅड्समुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो असा इशारा कर्करोग तज्ज्ञांनी दिला आहे.तज्ज्ञांच्या मते अत्यंत कमी कॅलरीचे डाएट किंवा डिटॉक्स ड्रिंक्सचा अतिरेक केल्यास शरीरातील नैसर्गिक पोषकता खालावते. अशा आहारामुळे यकृत व मूत्रपिंडांवर ताण येतो. परिणामी शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो पेशींना हानी पोहोचवून कर्करोगाची शक्यता वाढवतो. डिटॉक्सच्या नावाखाली शरीराला उपाशी ठेवणे किंवा फक्त ज्यूसवर, सॅलड खाऊन जगणे हे धोकादायक आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि भूक वेगवेगळी असते. त्यामुळे सोशल मिडीयावरील इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यावर अंधपणे विश्वास ठेवू नका.

सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड्समुळे अनेक तरुण आपली स्थिती न पाहता (Detox)स्वतःहूनच आहारात बदल करतात. मात्र हे बदल वैद्यकीय सल्ल्याशिवाय केले गेल्यास हार्मोनल समस्या, थकवा आणि त्वचेच्या विकारास तसेच गंभीर आजारास कारणीभूत ठरतात. अत्यंत कमी कॅलरीज असलेले क्रॅश डाएट शरीराला ‘स्टार्वेशन मोड’मध्ये ढकलते. यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. केवळ ज्यूस किंवा डिटॉक्स ड्रिंक्सवर जगणे प्रोटीन, फॅट, आयर्न, B12, फायबर यांची तीव्र कमतरता निर्माण करते आणि यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
बाजारात मिळणाऱ्या काही डिटॉक्स ड्रिंक्स, हर्बल पावडर,(Detox) स्लिमिंग टीजमध्ये धातू ,कृत्रिम रसायनं, हार्मोन्सवर परिणाम करणारे घटक आढळतात व हे घटक शरीरात साठून थायरॉईड, स्तन, पचनसंस्थेचा कर्करोग वाढवू शकतात. डॉ. अभिषेक पुरकायस्थ टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर सांगतात की, सोशल मीडियावर चुकीचे आणि असुरक्षित हेल्थ ट्रेंड्स फॉलो केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लक्षणे दुर्लक्षित केली जाऊ शकतात. योग्य वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर झाल्यामुळे आजार गंभीर रुप धारण करु शकतो. अनेक सोशल मीडिया ट्रेंड्स वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नसतात. असे ट्रेंड्स फॉलो केल्यामुळे कर्करोगग्रस्तांसाठी हानिकारक ठरू शकतात, कारण ते एखाद्याला पारंपरिक वैद्यकीय उपचारांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पीटलचे जनरल फिजीशियन (Detox)डॉ आदित्य देशमुख सांगतात की, सोशल मिडियावरील डिटॅाक्स ड्रिंक्सला बळी पडू नका आणि तुम्हाला जर खरोखरच डाएट करायचे असेल किंवा डिटॅाक्स करायचे असेल तर आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करुन घ्या आणि मगच योग्य तो पर्याय निवडा. आपण जर योग्य त्या तपासण्या केल्या नाहीत तर आपल्या शरीराला कशाची कमतरता आहे, लक्षणं काय आहेत हे कळणार नाही. या साऱ्याचा विचार करुन मगच आपल्याला डिटॅाक्स ड्रिॅक किॅवा डाएटची गरज आहे का ते ठरवणे योग्य राहिल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होईल असेही डॉ देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
महेंद्रसिंह धोनी IPL ला रामराम ठोकणार; ‘या’ दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा
वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार