ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणं फार कठीण असतं. अनेकजण यासाठी योग्य आहार,(Doctors) व्यायाम, पुरेशी झोप असे अनेक प्रयत्न करतात. पण तरीही त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत नाही. अशा वेळीच डॉक्टरांनी दिलेले महत्वाचे सल्ले कामी येतात. त्यानुसार तुम्ही तुमच्या सवयींमध्ये आणि उपचारांमध्ये बदल करू शकता.तज्ज्ञ म्हणतात, रक्तदाब हा कधीच स्थिर राहत नाही. याचं प्रमाण कमी जास्त होत असतं. याला सर्केडियन रिदम म्हणतात. पण अनेकांच्या मनात असणारी शंका म्हणजे रक्तदाब कोणत्या वेळेस वाढतो. पुढे आपण याबद्दल जाणून घेऊयात.

रक्तदाब हा तुमच्या हालचालींवर अवलंबून असतो. जेव्हा तुमचं शरीर(Doctors) सकाळी जागं होतं तेव्हा रक्तदाब वाढतो. दिवसभर याचं प्रमाण स्थिर असतं. मग दिवसाच्या शेवटी झोपताना याचं प्रमाण कमी होतं. हायपरटेन्शन, डायबेटीज, निद्रानाश किंवा हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी ही लय समजून घेणं महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.तज्ज्ञांच्या मते सकाळी सहा ते नऊ या वेळेत रक्तदाब जास्त असतो. झोपेतून जागं होण्याच्या या टप्प्यावर शरीर दिवसाच्या कामासाठी स्वतःला तयार करत असतं. त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याच कारणामुळे सकाळच्या वेळेत रक्तदाब वाढतो. सकाळी होणाऱ्या या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

दुपारच्या वेळेस रक्तदाब नॉर्मल असतो. या वेळेत आपण काम करतो, (Doctors)चालतो, विचार करतो अशा नियमित हालचालींमुळे शरीर नॉर्मल स्थितीत राहतं. पण कामाचा ताण, मानसिक तणाव, पाणी कमी पिणं, जास्त कॅफिन, वेळेवर जेवण न करणं किंवा सतत बसून काम करणं यामुळे या वेळेतही रक्तदाब वाढू शकतो.तर संध्याकाळी शरीराला हळूहळू विश्रांतीची गरज असते. मग रक्तदाबही थोडासा कमी होतो. तरीही जड जेवण, मद्यपान, भावनिक ताण किंवा खूप व्यायाम केल्याने संध्याकाळीही रक्तदाब अचानक वाढू शकतो. रात्री झोपेच्या वेळेस साधारण दहा ते वीस टक्क्यांनी रक्तदाब कमी होतो, यालाच नाईट डिपिंग असं म्हटलं जातं. हा टप्पा हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी महत्वाचा असतो. अशा प्रकारे रक्तदाबात बदल होत असतात.
हेही वाचा :
प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?
रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,
महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य