माणसाला जिवंत राहण्यासाठी ह्रदयाच्या बरोबर मेंदूचीही आवश्यकता असते.(damaged) जर या दोन्हीच्या कार्यात काही अडथळे आले की, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढत चालले आहेत. यामध्ये डिमेंशियाचा धोका झपाट्याने वाढताना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या तज्ज्ञांना आढळला आहे. पुढे आपण या आजाराची लक्षणे जाणून घेणार आहोत.डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश. या आजाराला मृत्यूचं सातवं कारण मानलं जात आहे. स्मृतिभ्रंश हा एकच आजार नसून तो एक सिंड्रोम आहे. म्हणजेच मेंदूशी संबंधित तितके गंभीर आजार आहेत त्यांचा समावेश यामध्ये होतो. याचा परिणाम म्हणजे, व्यक्तीची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि मानसिक स्पष्टता कमी होत जाते. काही रुग्णांच्या वागण्यातही बदल दिसून येतो.

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, भारतात सध्या साडेआठ कोटींपेक्षा (damaged)जास्त लोक स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. त्यामुळे हा आजार आता वैयक्तिक मर्यादेत न राहता सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न बनला आहे. यामध्ये डोळ्यांमधून भविष्यात स्मृतिभ्रंश होईल की नाही हे ओळखता येऊ शकते.फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डोळ्याच्या मागच्या भागात असलेली रेटिना भविष्यातील स्मृतिभ्रंशाचे संकेत देते. रेटिना ही डोळ्यांमधील अशी संवेदनशील ऊती आहे जी प्रतिमा टिपून त्या मेंदूपर्यंत पोहोचवते. ही ऊती नाजूक असते तिच्यात होणारे बदल थेट मेंदूच्या आरोग्याशी संबंधित असतात. ज्या लोकांची रेटिना पातळ असते. त्यांना अल्झायमर किंवा इतर प्रकारच्या डिमेंशियाचा धोका जास्त असतो.

दृष्टीसंबंधित मज्जातंतू हा मेंदूच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे.(damaged) त्यामुळे डोळ्यांमधील बदल हे मेंदूमधल्या बदलांचे हे संकेत असू शकतात. या आजारामुळे स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्यात गोंधळ होणे, बोलताना अडचणी येणे, शब्द चुकणे, निर्णय घेणे कठीण जाणे, मूडमध्ये बदल होणे, हालचाली मंदावणे आणि दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे डोळ्यांमधल्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून घेणे भविष्यातील गंभीर आजार टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य