रात्रीच्या जेवणात सगळ्यांचं हलके फुलके पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. रात्रीच्या जेवणात नेहमीच डाळभात, चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड चिंच भात(rice) बनवू शकता. आंबटगोडचवीच्या चिंचांचे नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. कमीत कमी साहित्यात तुम्ही चिंच भात बनवू शकता.

रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात सहज पचन होणाऱ्या चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. चिंचपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये चिंच भात(rice) बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
शिजवलेला भात
चिंच
मीठ
हळद
कढीपत्ता
जिरं
मोहरी
उडीद डाळ
लाल मिरच्या
शेंगदाणे
खोबऱ्याचा किस
कोथिंबीर
मीठ

कृती:
चिंच भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात चिंच अर्धा तास भिजत घालावी. त्यानंतर त्यातील बिया काढून गर गाळून घ्या.कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग भाजा. नंतर त्यात कढीपत्ता आणि हळद घालून मिक्स करा. फोडणी(rice) व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात शेंगदाणे आणि उडीदडाळ, लाल सुक्या मिरच्या घालून भाजा.त्यानंतर त्यात तयार केलेला चिंच गर घालून व्यवस्थित मिक्स करा. चिंच गर मसाल्यांमध्ये घट्ट होईपर्यंत शिजवा.तयार केलेल्या मिश्रणात शिजवलेला भात घालून वरून खोबऱ्याचा किस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबटगोड चिंच भात.

हेही वाचा :

या बँकेने घेतला मोठा निर्णय! ‘या’ सेवेसाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाणार
‘या’ क्रिकेटरला सख्ख्या मुलाप्रमाणे मानतात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी सारखंच करतात प्रेम
Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज