सिगारेट पिणं आता महागणार आहे. सरकारने यासंदर्भात नवीन कायद्याचा मसुदा तयार केला आहे.(Smokers)या नव्या कायद्यामुळे सिगारेटवरील एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या 18 रुपयांना मिळणारी सिगारेट 72 रुपयांना मिळणार आहे. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. किंमत वाढवल्याने तरी लोक धूम्रपान सोडतील अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली आहे. मात्र काहींनी व्यसनी लोक कितीही किंमत वाढवली तरी सिगारेट सोडणार नाही असं म्हटलं आहे.’रेडीट’वरील एका युझरने एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. यामध्ये लवकरच सिगारेटची किंमत वाढणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. या व्यक्तीने यामुळे तरी माझी सिगारेटची सवय कमी होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. स्वत: धूम्रपान करत असूनही या व्यक्तीने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “मी स्वत: धूम्रपान करणारा असूनही मी मला हा निर्णय आवडला आहे,” अशी कॅप्शन या व्यक्तीने दिली आहे. “यामुळे भारतामधील धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी मी अपेक्षा करतो. खास करुन तरुण वर्ग आणि् विद्यार्थ्यांमधील धूम्रपान याने कमी होईल अशी अपेक्षा आहे. मी सुद्धा कदाचित यामुळे सिगारेट सोडेन,” असं या व्यक्तीने म्हटलंय.

अनेकांनी या पोस्टवर मजेदार आणि उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदवल्यात.(Smokers) दिल्लीतील वायू प्रदुषणाचा संदर्भ देत, “मला काय मी तर दिल्लीतील हवामानात जगतोय. ते ही फ्री, फ्री, फ्री!” असं म्हटलं आहे. दिल्लीतील हवा इतकी प्रदुषित आहे की केवळ श्वास घेणं म्हणजे धूम्रपान करण्यासारखं आहे, असं या व्यक्तीला अधोरेखित करायचं आहे. अनेकांनी आता लोक इलेक्ट्रीक सिगारेट वापरतील असं म्हटलं आहे. काहींनी अशाप्रकारे सिगारेटची किंमत वाढवल्याने काळ्या बाजारामधून होणारी विक्री वाढेल अशी शक्यताही व्यक्त केली आहे. “याने गुंतागुंत अजून वाढेल. अनेक बनावट आणि तितकेच घातक पर्याय निर्माण केले जातील. जे आरोग्यासाठी अधिक घातक असेल,” अशी भीती व्यक्त केली आहे. “धूम्रपान आणि अल्कोहोलवर भारतात पूर्णपणे बंदी घातली पाहिजे,” असं मत अन्य एकाने नोंदवलं आहे.

संसदेने केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक, 2025 मंजूर केले आहे. (Smokers)राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी देऊन ते लोकसभेकडे परत पाठवले. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मांडलेल्या या विधेयकाचा उद्देश सिगारेट, सिगार, हुक्का, तंबाखू, चघळण्याची तंबाखू, जर्दा आणि सुगंधी तंबाखू यासह तंबाखू उत्पादनांवरील उत्पादन शुल्क आणि उपकर वाढवण्याचा आहे. सध्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा, 1944 नुसार, सिगारेटच्या लांबी आणि प्रकारानुसार, प्रति एक हजार सीगारेटच्या काड्यांवर 200 ते 735 रुपयांपर्यंत उत्पादन शुल्क आकारले जाते. नवीन दुरुस्तीमध्ये या शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढीचा प्रस्ताव आहे. त्यानुसार प्रति एक हजार सिगारेटवरील शुल्क 2700 ते 11 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. चघळण्याच्या तंबाखूवरील शुल्क 25% वरून 100% पर्यंत, हुक्का तंबाखूवरील शुल्क 25% वरून 40% पर्यंत वाढवलं जाणार आहे. पाईप आणि सिगारेटसाठीच्या धूम्रपान मिश्रणावरील शुल्कात 60% वरून 325% पर्यंत मोठी वाढ होणार आहे.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!